*बस एक सनम चाहिये... 🎼🎼🎼*
साधारण तीन महिन्यांपूर्वी ठाणे स्टेशन वर कुमार सानू व अलका याज्ञिक यांच्या कार्यक्रमाची जाहिरात पाहिली.. थोडक्यात Valentines week special with legendary bollywood singers duet.. Live concert at Hirananadani Thane..
अलका याज्ञिक ला या आधी 2016 मध्ये अंधेरीला गाताना मी प्रत्यक्षात पाहिलं होतं. काय तो आवाज काय तो पाठीमागचा महत्वाचा संगीताची धून धरणारा ताफा..खास करून गिटार वाजवणारे सारेच ग्रेट
कुमार सानू ला समोर ऐकायची इच्छा तर होतीच.. कारण आपली पिढी 90 2000 2010 पर्यंतचा We can say one of the golden Era ♥️ काळ या दोंघासोबत साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल', उदित नारायण, सोनू निगम, एसपी, अभिजीत, शान, बाबूल सुप्रियो, केके ऐकत मोठी झालेली. यात आशाताई आणि अर्थातच लता दिदीचे नाव तर गुरूस्थानी...
मी लागलीच bookmyshow वरून advance तिकीट काढून ठेवले.
प्रचंड ट्रॅफिक चा मनस्ताप सहन करत कल्याण ते ठाणे आम्ही तीन तासात पोहचलो.. कधी नव्हे तर प्रचंड गर्दी व श्रोत्यांच्या प्रतिसादात शो वेळेवर सुरू झालेला.. असो.
आता थेट विषयावर, जसजसे कार्यक्रमाच्या ठिकाणाजवळ जाऊ लागलो तसा शे दोनशे मीटर अंतरावर सानू दा चा आवाज कानावर आला. झटपट तिकिट दाखवून आम्ही खुर्ची पकडली. तेव्हा "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" सुरू होते. ज्याचे गाणे गुणगुणत लहानाचे मोठे झालो किशोरवयीन असताना व अजूनही ज्याचा पंखा असलेला मी... आता समोर माझ्या तो प्रत्यक्षात गात होता. काय तो आवाज काय तो माहौल काय तो जमलेला संगीत प्रेमी समुदाय सारंच अद्भूत. आशिकी _ साजन_ दिवाना_ बाजीगर ते 1942 ए लव स्टोरी पर्यंतचा सलग पाच वर्षे फिल्मफेअर पुरस्कार घेणारा कुमार सानू उर्फ केदारनाथ भट्टाचार्य. फिल्म इंडस्ट्रीत बंगाल प्रांतातील कलाकारांचे मोठे योगदान आहे. परवा अमावस्या होऊन गेलेली आकाशात चंद्र नव्हता पण दादाने जेव्हा "मेरा चांद मुझे आया है नजर" गायलं तेव्हा खरंच आकाशात चार चांद दिसत अंगावर रोमांच उभे राहिले. अनेक बहारदार गाण्यांची मेजवाणीच.. मध्यान्ह पर्वात सुरमयी अलका याज्ञिक चे आगमन धडाक्यात झाले. "तुम पास आये" "मग एक दो तीन चार पाच" अनेक melodies व romantic गाण्याची बरसात. पण मला व्यक्तिश काल अलका याज्ञिक चा आवाज तिच्या potential इतका जाणवत नव्हता. आठ वर्षांपूर्वीच अंधेरीला त्यावेळेचे गाण्यांचे सादरीकरण ते कालचं यात बराच फरक जाणवला. अर्थात गेले चाळीस वर्ष सतत सरस्वतीची प्रार्थना करण मेहनत घेत इथवर टिकून राहणं हे टिका करण्या इतपत सोपं नाहीच मुळी.. माझाही तो उद्देश कधीच नसणार फक्त एक रसिक श्रोता म्हणून मला फरक जाणवला. त्यामागे काही तत्कालीन कारण असू शकेल. शेवटच्या सत्रात ज्याची सर्व जण वाट पाहतं होते ते दोघांना एकत्र गाताना. One of the best duet couple. याआधी टीवी वर ऐकलं पाहिलं काल तो योग प्रत्यक्षात आला.. The best duet couple ever... दादाची re-entry खासच. सुरूवातच ddlj च्या "तुझे देखा तो ये जाना सनम ने" या दोघांची शेकडो हिट गाणी आहेत. नदीम श्रवण, अन्नू मलिक, जतीन ललित तर मजरूह, आनंद बक्षी, समीर पर्यतचा प्रवास. एक से बढकर एक त्यांनी गाणी सादर केली. समारोप "लडकी बडी अन्जानी है " या गाण्यातून.. आज सानू दा वय वर्ष 68 पण what a tremendous energy he is having while performing on the stage. कुठून येते ऐवढी ऊर्जा.. Though he is 68 but looks not more than 45..
लता आशा उषा रफी किशोर मुकेश आताचे सुरेश वाडकर सानू दा अलका यांना पाहून कोण म्हणेल गायकांच्या करीयरला मर्यादा किंवा विशिष्ट कालावधी असतो....
हि सारी मंडळी तर साक्षात गंधर्वच...
योगेश चंद्रकांत अहिरे

No comments:
Post a Comment