Saturday, 10 August 2024

Sentimental @ Peb fort.

 *कहाणी फोटोमागची* .....

बैल... तुम्ही म्हणाल बैल .. बैल तर आहे हा यात काय नवीन ते !

पण या फोटो मागे अनेक पैलू व भावनांचे पदर जोडलेले आहेत...  

बैलाच्या डोळे विलक्षण बोलके आहेत. त्याच्या डोळ्यातील आर्जव करूणा खुप काही सांगून जाते. कोण म्हणतं जनावरं बोलू शकत नाहीत... उलट मी स्वतःच म्हणेन ते आपल्याशी मुक संवाद साधतात फक्त आपली समजूत घेण्याची व ऐकण्याची ऐपत असावी... 

         एक साधक जो गेली पंचवीस वर्ष कल्याणहून पेब किल्ल्यावर दत्त गुरूंचे नामस्मरण व साधना करतोय. मागे पेब ला तीन चार वेळेस जाणं झाले तेव्हाही साधक प्रसाद जोशी राहणार टिळक चौक कल्याण... आताचे नाव स्वामी इशानंद...यांची भेट झाली होतीच.. यंदा ही मी व मनोज त्यांना भेटलो... मला अध्यात्म काहीही कळत नाही किंबहुना बाजारू देवस्थान मी कदापी जात नाही... पण काही जागा मला स्वतःला साद घालतात. पेब किल्ल्यावर हाच समर्थ आश्रम त्यातला एक. जिथे निसर्ग व अध्यात्म एक झाले ती नीरव शांतता मला आपलीशी वाटते. मागच्या वेळेस पण साधकाचे अनुभव ऐकत रहावेसे वाटत होते या वेळेस ही तेच घडले. त्या माणसाची चर्या तेज वाणी सारे काही अद्भूत.. कुठून येते हे सारे ध्यान धारणा गुरू नामस्मरण सतत समाधी अवस्था... स्वतःशी परमात्मा गुरू व निसर्गातील अद्भूत शक्तीशी संवाद साधणं सोपं नक्कीच नाही. अशा एकांत व निर्जन जागी हे सारं जुळून येणं हा कपिलाशष्ठीचा योग. कुणी कधी दिलं तर तेवढं स्वीकारून घ्यावे अन्यथा वाट पहावी. सोबत चर्चेदरम्यान खंत जाणवली ती आपल्याच हिंदू धर्मीय वृत्तीची.. निती सत्य आचरण सहिष्णुता संवेदना संस्कार याची.. सारे नियम मोडून हल्ली गडावर जो राबता व गैरप्रकार वाढले आहेत ते नक्कीच समर्थनीय नाही. मदत तर दूर पण आपल्याच धर्मातील गुंड प्रवृत्ती त्रासदायक ठरताय.. इथे वीर सावरकरांचे एक वाक्य नमूद करावेसे वाटत हिंदूना हिंदू पासूनच धोका आहे.

मराठा रियासत मध्ये पण लिहले आहे, कधी न एकरूप व्हावे हा शाप मराठी रक्ताला...

याच साधकाने अगदी लहान असताना बैल व गाय सोबत पाळले. गो पालन गौशाळा याला आपल्या धर्मात महत्त्व आहे.. गायीच्या सानिध्यात काही काळ बसल्यावर खरंच वेगळीच प्रसन्नता लाभते हा तर माझा स्वतःच अनुभव. साधकाने ते निष्ठेने पाळत त्यांची देखभाल सुरू केली. पहाता पहाता दोघेही वयात आले. निसर्ग इथेही त्याच काम करतच होता. पण नियतीचा फेरा दुर्दैवाने आड आला. बैलाची गाय बिबट्याने मारून टाकली. आज जोडीदार पैकी जर एक अचानक गेला तर दुसर्याला कसं वाटेल ? अशीच अवस्था सध्या या मुक्या प्राण्याची.. त्याचे डोळे सदैव पाणवलेले. नजर सतत तीचा शोध घेत असते. कानालाही तीच्या आवाजाची आस आहे. पण ती गाय मात्र कुठेच नाही कुठेच नाही... कोण समजून घेणार या भावना..

साधक या बद्दल फार चिंता व्यक्त करत होते... 

बरं पेब किल्ल्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की चारही बाजूला नैसर्गिक रित्या तासलेले कडे त्यातून गडावर गाय म्हैस या कुळातील कुणीही वर येणं अवघडच...

साधक  मी काही ट्रेकिंग संस्था, रेस्कयू टिम सोबत बोलून पहात आहेत कि त्या मुक्या जीवाला निदान गडाखालील गावात सोडता येईल का ? निदान एका जीवाची घालमेल तरी थांबेन व न जाणो पुन्हा एखाद्या हिस्त्र जनावराचे सावज न होवो..

दहा मिनिटांचा प्रसंग मला तरी मनाला चटका लावून गेला मागच्या ट्रेक मध्ये... ते तुमच्या सोबत शेअर करावेसे वाटले ... म्हणून हा लेखप्रपंच... 🙏🙏🙏

                                               योगेश चंद्रकांत अहिरे...

No comments:

Post a Comment