Friday, 2 February 2024

Mukesh

काही बाही सुचतंय ट्रेन मध्ये जागा मिळाली टाकू खरडून.... राहिलं तर घरी जाऊन मुकेश फिवर उतरायच्या आत पूर्ण करणार.... 

     जयदीप सर्व प्रथम तुझे आभार जेणे करून हा मुकेश
चा १०० व्या जयंतीनिमित्त तू ठरवलेला व संपादन केलेला शो याची देही याची डोळा पहायला मिळाला... अक्षरश तुमच्या सुरांच्या धारांत न्हाऊन निघालो.. तुझे व टीमचे सादरीकरण व संकल्पना जाम आवडली. तुझा आवाज अस्सल मुकेश टच होता आज, दिमतीला असणारे सहाय्यक गायक वाद्यवृंद सर्वच एकदम परफेक्ट जुळूवून आणलेस बघ. निवेदक मंदार खराडे तर भारीच मुकेश चा सारा जीवनपट उलगडून अंतरंग ज्या प्रकारे मांडले त्याला तोड नाही... बॅकग्राऊंड वर फक्त सहा जण पण कमाल केली सर्वांनी...

 *आवारा हू आवारा हू* पासून लागलेला सूर तो नंतर मधुमती मधील *सुहाना सफर और ये मौसम हसीं*

पुढे duet *सावन का महिना पवन करे सोर* हे गाणं ऐकून तर शब्दश: पुलं च्या भाषेत, पत्रे ठोकणारा तांबट गल्लीतून फिरवून आणल्यावर सनई चे सूर कानी पडावे तसेच वाटले.. मुकेश चा प्रवास जसा पुढे उलगडत होता अगदी त्याच प्रमाणे एक से बढकर एक गाणी तू सादर केलीस.. मुलूंड चा श्रोतावर्ग पण दर्जा राखलेला खास करून वयस्कर मंडळी बरीच होती अर्थातच मुकेश चा काळ 50, 60,70 साधारण ढोबळमानाने सांगायचं झालं तर तिसरी कसम ते कभी कभी पर्यतचा. तिसरी कसम मधील गाणं " *सजन रे झूठ मत* *बोलो* ...  

 *तुम्हारे महल चौबारे यही रह जायेंगे प्यारे 

अकड किस बात की प्यारे

ये सर फिर तो झुकाना है, 

सजनरे झुठ मत बोलो..* 

हे गाणं ऐकून तर माझ्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले. मुकेशचा तो आर्त स्वर आत कुठेतरी मनाला स्पर्शून गेला. एक अनामिक एकटेपणाची, एकाकीपणाची भावना मनात निर्माण झाली आणि माझे डोळे नकळत पाणावले. हृदयाची तार छेडण्याचे हे दैवी सामर्थ्य किती जणांना लाभतं? अशी असामान्य माणसे जगात फार थोडीच असतात. मुकेश असाच एक असामान्य गायक होता! मध्यान्ह पर्वात गायलेलं जगण्याची फिलाॅसाॅफी सांगणारं *किसी की मुस्कुराहटो पे हो निसार... जिना ईसी का नाम है..* तसं पाहिलं तर राज कपूर व मुकेश हे एक समीकरणच होतं. मी कुठेतरी वाचलेलं आठवतंय 

रेकार्डिंग मनासारखे पार पडले की राज कपुर त्याच्या टीम बरोबर जंगी सेलेब्रट करत असे. पण त्यादिवशी कुठल्यातरी गाण्याचे रेकॉर्डींग पहाटे ४ वाजेपर्यंत चालले होते. नंतर थकले भागलेले सर्व जण घरी गेले. मुकेशनी राजकपूर साठी खास आणलेला जार दुसर्या दिवशी अमेरिकेची फ्लाईट असल्याने नोकराच्या ताब्यात देऊन जपून ठेवायला सांगितले. पुढे नंतर जेव्हा मुकेश चे निधन झाल्याचे राज कपूर ला समजले तेव्हा दुखी होऊन तो म्हणाला,  "आज तो मेरी आवाज मुझसे जुदा हो गई"! 

     खूप दिवसानंतर एका संध्याकाळी जेव्हा राजकपूरनी नोकराला ड्रिंकसची तयारी करायला सांगितली असता त्याने तो जार त्यांच्यापुढे ठेवला आणि सांगितले, "मुकेशजी जानेसे पहले आपके लिए दे गए थे"। मोठ्या मुश्किलीने आवरलेले राजकपूरचे अश्रू पुन्हा वाहू लागले. मित्राची कमी तीव्रतेने जाणवू लागली. मुकेशजी तर खूप दूरच्या प्रवासाला निघून गेलेले, कधिही न परतण्यासाठी! पहिले शैलेंद्र, मग जयकिशन आता मुकेश...बिछडे सभी बारी बारी.. पुन्हा मैफिल जमणार कशी ? असेच काही फिल्मी यारी दोस्तीचे भावनिक किस्से कायम लक्षात राहतात. असो....

 *न* शब्द व मुकेश एक समीकरणच ... यानुसार *चंदन सा बदन चंचल चितवन धीरेसे तेरा ये मुस्काना..* क्या बात है. काय गायलास तू.. अप्रतिम..दिल खुश हो गया.. मला पर्सनली वाटत रजनीगंधा मधले मुकेश ला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले पण त्याहून अधिक श्रवणीय असणारे.. *कई बार युही देखा है ये जो मन की सीमा रेखा हे* गाणं तू घ्यायला हवं होतं.. याचं चित्रिकरण जे ठाकूर, पालेकर व विद्या सिन्हा सोबत मुकेश चा आवाज भन्नाट केमिस्ट्री आहे.. मला विद्या सिन्हा व सुलक्षणा पंडित त्या काळी जाम आवडायच्या अगदी girls next door.. जतीन ललित ची बहिण सुलक्षणा तिचे किशोर सोबतचे duet *बेकरार दिल तू गायेजा खुशियों से भरे वो तराने* ... पण पार्श्वगायन बद्दल सुलक्षणा पंडित शापित गंधर्व च.. असो ..विषयांतर नको..

मनोजकुमार शोर मधील भावविभोर गाणं *जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है.* तू आणि प्रिती निमकर जोशी ने खुपच छान गायलं ..

उत्तरार्धात कभी कभी १९७४ चोपरा बॅनर, साहिर व खय्याम... बोल मुकेश गाणं टायटल साँग... लिहिण्याची गरजच नाही. सांगता केली ती अर्थातच पुन्हा जोडगोळी राज कपूर व मुकेश *... **ये मेरा गीत जीवन संगीत.

कल भी कोई दोहरायेगा. जग को हसाने बेहरूपीया रूप बदलकर फिर आयेगा...*** अगदी साजेसा समारोप केलास बघ...

पुनश्च एकवार तुझे अभिनंदन... सरस्वती प्रसन्न आहे तुझवर...

ऐसेही आगे बढो हम तुम्हारे साथ है...  

 *ता.क.* आम्हाला विसरू नकोस, तसे आम्ही विसरू देणार नाहीच म्हणा....

All the best ... तूर्तास निरोप घेतो.. 


2 comments:

  1. भाई लकी है तू नेहमी सारखे सुंदर विवेचन. मला पहिले मुकेश आवडायचा नाही.पण जसे गाणे कळायला लागले,तसा आवडायला लागला. किसिकी muskqrrahto पे तर आपले लाईफ anthumn च झालाय. सुंदर

    ReplyDelete