कावनई आणि बळवंतगड
१५
ऑगस्ट विकेंडला जोडून
आल्यामुळे तीन दिवस
हाथाशी होते मनसुबा
तर मोठ्या मोहिमेचा
होता. पण हल्लीची
पब्लिक हॉलिडेला होणारी बेधुंद
पर्यटकांची गर्दी तसेच बेशिस्त
वाहनचालकांमुळे होणारी वाहतूकीची कोंडी,
टोल नाक्यावर लांबलेल्या
गाड्यांच्या रांगा यामुळे कुठे
बाहेर जाणे नकोसे
वाटत होते. त्यातच
पुनमची फोनवरून विचारणा, "सुट्टी
आहे कुठे ट्रेक
ला जाणार आहात
का ?" मनात पुन्हा
भटकंतीचे वारे वाहू
लागले. चला नको
मोठी मोहिम पण
सहपरिवार एखादा वन डे
छोटा ट्रेक तर
नक्कीच जाऊ शकतो.
मग पुनमला होकार देऊन जवळचाच बरेच दिवसापासुन हुलकावणी देत असलेला ‘कावनई’ आणि ‘बळवंतगड’ करायचे ठरवले. तीन दिवसापैकी दोन दिवस घरकामासाठी देऊन मधल्या एक दिवसाची निवड केली.
सकाळीच पुनम व आमोद सोबत त्यांची छोटी वल्लरी आणि मी, अश्विनी, छोटी चार्वी असे सर्व कुटुंब लवाजमा घेऊन ईगतपुरीच्या दिशेने निघालो. तुरळक गर्दी वगळता रस्ता तसा मोकळाच मिळाला. ईगतपुरीच्यापुढे वैतरणा त्र्यंबकेश्वर रस्त्याला डावीकडे वळालो. वाकी फाट्याहून उजवीकडे कपिलधारातीर्थ कावनई गावाकडे जाणारा रस्ता घेतला.
मग पुनमला होकार देऊन जवळचाच बरेच दिवसापासुन हुलकावणी देत असलेला ‘कावनई’ आणि ‘बळवंतगड’ करायचे ठरवले. तीन दिवसापैकी दोन दिवस घरकामासाठी देऊन मधल्या एक दिवसाची निवड केली.
सकाळीच पुनम व आमोद सोबत त्यांची छोटी वल्लरी आणि मी, अश्विनी, छोटी चार्वी असे सर्व कुटुंब लवाजमा घेऊन ईगतपुरीच्या दिशेने निघालो. तुरळक गर्दी वगळता रस्ता तसा मोकळाच मिळाला. ईगतपुरीच्यापुढे वैतरणा त्र्यंबकेश्वर रस्त्याला डावीकडे वळालो. वाकी फाट्याहून उजवीकडे कपिलधारातीर्थ कावनई गावाकडे जाणारा रस्ता घेतला.

वाटेत मध्येच थांबुन हा
कावनई आणि बुधा
डोंगराचा फोटो.
नुकताच
दुरूस्त करून झालेल्या
निकॉन क्यामेराने पुन्हा
दगा दिला, मग
सर्व फोटो आमोदने
नवीनच घेतलेल्या moto g4 ने
काढले.
गावातल्या मंदिरासमोर गाडी लावली. गावातच कावनई किल्ल्याची सोंड उतरली आहे त्याच सोंडेच्या उजव्या बाजूने तिरक्या रेषेत आस्तेकदम वर जात पुन्हा वळून सोंडेवर आलो.इथुन मागे कावनई गाव आणि अप्पर वैतरणा जलाशयाचा काही भाग
गावातल्या मंदिरासमोर गाडी लावली. गावातच कावनई किल्ल्याची सोंड उतरली आहे त्याच सोंडेच्या उजव्या बाजूने तिरक्या रेषेत आस्तेकदम वर जात पुन्हा वळून सोंडेवर आलो.इथुन मागे कावनई गाव आणि अप्पर वैतरणा जलाशयाचा काही भाग

छोट्या चार्वी आणि वल्लरी
सोबत चढताना भारीच
ओढताण जाणवत होती
पण त्या दोघी
मात्र त्यांच्या मस्तीत
आणि धुंदीत.

शहरातल्या
प्रदुषणयुक्त रोगट वातावरणाच्या
तुलनेत इथल्या डोंगरातल्या मोकळ्या
हवेत खुपच उत्साहात
आणि प्रचंड उर्जेने
हसतखेळत.. खऱच मला
तर या लहान
मुलांचा हेवा वाटतो
असो.. पुढे सरकताच
गडाचा कडा उजवीकडे
ठेऊन डावीकडच्या मळलेल्या
वाटेने काही अंतर
जात घळीत असलेला
गडाचा दरवाजा, लोखंडी
शिडी आणि कातळातल्या
पायर्या दिसल्या.
शिडीवरून नाशिकमधला एक ट्रेकर्सचा ग्रुप उतरत होता तो पर्यंत खालीच थांबलो. ते सर्व उतरल्यावर शेवाळलेली एकेक पायरी पार करून शिडीच्या खाली आलो. चार्वी आणि वल्लरी सोबत सावकाश शिडीने वर जात दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केला.
उजवीकडे एक गुहावजा देवडी आहे.
पुढे
काही पायर्या चढून
गडमाथ्यावर आलो. वातावरणात
बदल जाणवला काळे
ढग दाटून गार
वारा वाहू लागला.
काही
वेळातच रिमझिम पावसाला सुरूवात
झाली. माथ्यावरचा मोठा
तलाव आणि पुरातन वास्तु
देवीचे
मंदिर, मंदिरात सध्या मौनी
बाबा रहातात.
मंदिरासमोरच
तलावाकाठी हा नंदी
आणि शिवपिंड.
छोट्याची मस्ती आणि दंगा फार्मात.
दुपारचा
घरातून आणलेला जेवणाचा डबा
होता,मंदिराच्या आवारातच जेवणाची पंगत
मांडली. साधुबाबा ला जेवणासाठी
बोलावले पण त्यांनी
हातवारे करून खूणेनेच
नकार दिला. साधुबाबांना
पाहून चार्वी सारखा
एकच प्रश्न विचारत
होती, "हे बाबा
बोलत का नाहित
? आई आई सांग
ना" आम्ही मात्र चार्वीला
गप्प बसायला सांगत
होतो. तर ती
स्वत: म्हणाली, " हां..
बाबांना दातच नाहीयेत
म्हणून ते बोलत
नाही" हे ऐकल्यावर
मात्र आमची हसून
पुरेवाट झाली. जेवणानंतर सर्व
जागा साफसफाई करून
आवरून, मौनी बाबांना
सोबत आणलेली फळे
देऊन गडफेरीला निघालो.
मंदिराच्या डावीकडच्या वाटेने गेल्यावर
खालच्या बाजूला पाण्याचे टाके
आणि तटबंदी दिसली.
गडमाथा
तसा विस्ताराने लहानच,त्रिंगलवाडी
धुक्यात पुसटसा ओळखु आला
पण कळसुबाई, अलंग
मदन कुलंग तसेच
त्र्यंबक रेंज पूर्ण
धुक्यात बुडाली होती. पुन्हा
दरवाजाकडून डावीकडच्या वाटेने गडाच्या
उत्तरेकडच्या टोकावर गेलो इथुनच
खाली कावनई गाव,
ढगांची चादर ओढलेला
वैतरणा जलाशय आणि आम्ही
आलो ती वाट
दिसली.
सर्वांना
सांभाळत सावकाश शिडीने उतरून
डावीकडच्या छोटा गुहेत
गेलो हि गुहा
तिथे आलेल्या एका
धनगर मुलाने दाखवली
अन्यथा उतरण्याच्या नादात लक्षात
येणारच नाही.
ग्रुप
सेल्फीचा प्रयत्न !
उन पावसाचा खेऴ
अनुभवत पाऊण तासात
खाली गावात आलो.
गाडी काढून बळवंतगडाकडे
निघालो. घाटणदेवी समोरून कसारा
घाटाला पर्यायी मार्ग आहे.
फक्त
हलकी वाहने तो
पकडून ते थेट
मोखाडा रस्त्यावर आलो. काही
मिनिटातच विहीगावाच्या मधून माल
गावासाठी डावीकडे वळालो, अरूंद
वळणावळणाचा घाट चढून
अंदाजे दहा मिनिटातच
थोडं सपाटीवर आलो,
मध्ये वाटेत एका
गुराखी आजोंबाकडून वाटेची खात्री
करून बरोब्बर बळवंतगडाकडे
जाणार्या पायवाटेजवळ गाडी थांबवली.
कावनई ते बळवंतगड
या तीस चाळीस
मिनिटाच्या प्रवासात गाडीतले बाळगोपाळ
मंडळ फुल्ल एसी
मुळे चक्क गाढ
झोपून गेले. त्यांच्या
शारिरीक क्षमतेनुसार अर्थातच दमछाक
तर होणारच. त्यांना
झोपेतून उठवणे थोडे अवघडच
बरं मग दुसरा
पर्याय अश्विनी आणि पुनम
गाडीतच थांबतील, मी आणि
आमोद दोघांनीच जायचे.
इतक्या जवळ येऊन
असं अर्धवट काम
मला तरी पटत
नव्हत, थोड्या आवाजाने चार्वीला
जाग आली तिच्या
कुरबुरीने वल्लरी पण जागी
झाली. दोन्ही मुली
काही मुड मध्ये
नव्हत्या मग मी
त्यांना वर किल्ल्यावर
आईसक्रीम ची गाडी
आहे सोबत चॉकलेट
मिळेल असं काहीतरी
सांगून तयार केले.
गाडी एका कडेला
उभी करून कबिल्यासंगे
गडावर निघालो.
अतिशय
आरामदायी सौम्य चढणीची चाल,
वीस मिनिटांतच भग्न
तटबंदीतून वर चढलो.
थोड
अतंर पुढे जात
उजवीकडे कड्यालगतच पाण्याचे टाके
पण पाणी मात्र
पावसाळा असुनही पार तळाला
बहुतेक टाक्याखालच्या खडकातून झिरपत जात
असावे जसा प्रकार
लोहगडाच्या हत्ती तलावाबाबत घडतो
तसेच काहितरी.
कसारा
घाटातली रस्ते, छोट्या गाड्या
तसेच घाटातून जाणारी
रेल्वे हे पाहून
वल्लरी आणि चार्वी
यांना मात्र आईसक्रीमचा
विसर पडला.
खऱच
निसर्गात जाऊन आपणही
आपले ताण तणाव
विसरतोच की, तिथली
ऊर्जा सामावुन घेत
पुन्हा नव्या जोमाने कामाला
सुरूवात करतोच ना. मग
ही छोटी मुलं
तरी कसे अपवाद
ठरतील. माल गावाच्या
पठारावर सुर्य अस्ताला जात
होता.
पण
पाय काही हालेनाच,इथे वातावरण
खुपच छान मिळाले,
हिरव्यागार पठारावर स्वच्छ सुर्यप्रकाश,
आभाळात विरूध्द दिशेला मात्र
काळे ढग त्यानुसार
त्या सुर्यकिरणांचा मिलाफ
आणि सोबतीला गार
वारा खऱच एकदम
सुंदर यामुळेच हा
बळवंतगडाचा ट्रेक कायम स्मरणात
राहील यात शंकाच
नाही. विही
गावचा धबधब्याला भेट
देण्याच्या विचाराने खाली उतरलो.
पुन्हा खोडाळा रोडवर येऊन
डावीकडे विही धबधब्याकडे
निघालो. सगळी गर्दी
परत येत होती
सहा वाजत आले
होते मनात विचार
आला चला गर्दी
गेली असेल तर
धबधबा व्यवस्थित पहाता
येईल. चार्वी आणि
वल्लरी तर धबधब्यात
जाण्यासाठी खुपच उत्सुक
होत्या. पण पुढे
जवळ जाताच अजुनही
गाड्यांची गर्दी होतीच. त्यावरूनच
सकाळच्या परिस्थितीचा अंदाज आला.
अगदी ओसरती गर्दी
पाहून आमचा उत्साह
मावळला पण त्या
दोघींसाठी मात्र हजेरी लावून
आलो. तिकडेचे दृश्य
आणि काहीवेळा पूर्वी
अनुभवलेले क्षण यात
खुपच तफावत होती.
आम्ही सुध्दा तेच
चांगले क्षण मनात
जपत त्या गर्दीतून
लगेच बाहेर पडलो.
परतीच्या प्रवासात तर रस्ता
मात्र खुपच मोकळा
मिळाला. घरी परतलो
ते मनात एक
चांगली आठवण घेऊनच....
योगेश चंद्रकांत आहिरे



















Jabri...Yogesh.....
ReplyDeleteparat ekga sudar...trek...vatavarn khupach fresh watele cilcks varunnn...apartim...
Thanks Hemant. Yes, about climate fortunately we found best especially on Balwantgad.
ReplyDelete