Wednesday, 6 April 2016

Chakdev

चकदेवच्या प्रेमात




चार दिवसाची सुट्टी, भर उन्हात कुठे जावे तेच सुचेना. एका दोघांना विचारले पण अपेक्षित प्रतिसाद नाही. बंर परिटघडीचे पर्यटन करावे तर ऐन वेळी सर्वच हॉटेल आणि लॉज फुल्ल. अशातच सायंकाळी पलीकडून चकदेवच्या श्री. संतोष जंगमचा फोन. ख्याली खुशाली झाल्यावर " एक काम करा चार दिवस सुट्टी आहे ना, याच तुम्ही शिमग्याला. मला माहित नाही मी वाट बघतोय" इति संतोष. असं अचानक बोलावण आल्यावर मग काय थांबतोय. चकदेव पर्वत हि सह्याद्रीतली शिवालयांची खऱतर देवभूमीच. कोणत्याही ऋतूत कधीही जा नवनवीन वाटणारा आणि बोलावणारा निसर्ग. जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा पासूनच चकदेव पर्वत च्या प्रेमात. चकदेव पर्वत ,साधारण ११०० ते १२०० मीटर ऊंचीवर सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वसलेले आहेत. चकदेवचा श्री चौकेश्वर तर पर्वतचा थोरला जोम मल्लिकार्जून अगदी रामायण महाभारताचा पौराणिक संदर्भ.रिती रिवाज आणि रूढी परंपरा पाळून आधुनिकतेची कास धरून प्रेमाने पाहुणचार करनारे जंगम बांधव. चार दिवस निसर्गाच्या सानिध्यात एका वेगळ्या उत्सवात सहभागी व्हायला मिळाले. खऱच सह्याद्रीच्या वारीत असे कितीतरी मोलाचे ऋणानुंबध जुळलेत अजून काय हवे......




रघुवीर घाटाची सुरूवात 

घाटातून उजवीकडे महिमंडणगड

गावात मस्ती मज्जा आमची चार्वी.

देवाची पालखी

चौकेश्वर शिवालय. चकदेव

गावातला शिमगा पालखी उत्सव

परतीच्या वाटेवर




No comments:

Post a Comment