सोलापूरकर अरण्यऋषी सिध्दहस्त निसर्ग लेखक मारूती चितमपल्ली यांच्या रानवाटा मध्ये अरणी प्रकरणात आदिवासी मुलगी 'अरणी' ही वुड्स नामक इंग्रज अधिकारीला म्हणते, लिहायचं तर पहाटे लिहा..तशी तो सुरूवात ही करतो लिहायला. वुड्स ला फरक जाणवतो तो असा. दिवसा आपण लिहतो व पहाटे तो आभाळातला देव आपल्याकडून लिहून घेतो.. अगदी असंच बहुतेक वेळेस माझ्या बाबतीत घडतं. मी काही लेखक नाही जे दिसतं जे अनुभवतो त्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे.. माझ्यावर काही लेखणीचे संस्कार झालेले नाहीत.
काल बर्याच वर्षाच्या कालावधीनंतर शाळेच्या मित्र मैत्रिणीचं गेट टूगेदर मग येताना आम्हा सभासद मित्रांचा बदलापूर अंबरनाथ ला श्रमपरिहार स्काॅच ने बहरून आला. रात्री घरी येऊन झोपायला अंमळ उशीरच झाला. तरी भल्या पहाटे उठून अश्विनी व चार्वी यांना ट्रेक साठी स्टेशन वर सोडून आलो, येताना गाडी चालवताना सुकाणू हातात असताना हेच, पहाटे आठवलं जे लागलीच खरडून काढलं.....असो..
हो ना होना करत रोज what's app वर मेसेज चा पाऊस पाडून ठिकाणं फायनल झालं. नेहमी येणारे Near & Dear मेंबर फिक्स झाले..
Karjat Heitage Resort . Karjat.. या साठी कल्पना ने लीड घेतली होती.. खरंतर मला व्यक्तिश रिसॉर्ट प्रकरण फारसं आवडत नाही .. निसर्गात रमणारा मी अशा ठिकाणी दडपला जातो.. मला तोच तोच कृत्रिमपणा जाणवतो असो.. पण मैत्र व भेटीगाठ हा मुद्दा व मंडळीचा आग्रह व शिव्या स्वीकारून तयार झालो. आता रिसॉर्ट म्हटलं की स्विमिंग पूल व रेन डान्स व डिजे आलाच. पण या पेक्षाही गेल्या गेट टूगेदर पासून मुली काही तरी गेम्स ठरवून येतात व ते खेळण्यात मजा तर येतेच व वेळ पण चांगला जातो. मला व्यक्तिश या व्यतिरिक्त काही तरी वेगळ यात मिक्स करावं असं वाटतं होतं जशी भर पावसात गाण्यांची मैफल..
जयदिप आमचा शाळेतील वर्ग मित्र इ. सातवी ला आमच्यासोबत होता. मधला काळ दोन तीन वेळेस हाय बाय सोडलं तर १९९४ ते २०२३ खासा भेट जमून आली नव्हती.. फेसबुक वर ऐकेमेकांचे अपडेट्स घेत आमच्यात थोडेफार मेसेज व्हायचे तीच काय कनेक्टिव्हिटी. जयदिप गाण्यांत व संगीतात वस्ताद माणूस.. शाळेत असताना अनेक वेळेस गाणी म्हणून दाखवायचा. गॅदरींग मध्येही त्याचा परफॉर्मन्स भारीच होता. सुर ताल, सारेगमप, इंडियन आयडॉल इ अनेक रिऍलिटी शोज व बॅक एण्ड ला अनेक गाणी तर आता प्लेबॅक सिंगर होण्याच्या वाटेवर असलेला जयदिप प्रचंड मेहनती व कलासक्त रसिक व्यक्तिमत्त्व.
तर सांगायचं असे, या गेट टूगेदर ला जयदिप ला सोबत घेऊ जेणेकरून सारेच एकत्र जमल्यावर मज्जा येईल. जयदिप ला मी विचारल्यावर तारीख नोट करून त्याने आढेवेढे न घेता लागलीच होकार कळवला. गेटटुगेदर चा दिवस उजाडला, सकाळी ठरल्याप्रमाणे अनेक वर्षांनी आम्ही दोघे भेटलो पण क्षणातच जो गप्पांचा जोर चढला की असं वाटतंच नव्हतं, या चंदेरी दुनियेत मोठा होत असलेला जयदिप व शाळेत बाजूला बसणारा जयदिप यात काहीच फरक नाही..
तेच आमचे तेव्हाचे बाॅलिवुड आकर्षण, क्रिकेट वेड, सायकली व गाड्यांचे वेड सारं तसंच.. काही सेकंदातच आमची वेव्ह लेंथ जुळून आली. खरं तर कुणाचे कुणाशी सुत जमावं व वेव्ह लेंथ जुळावी याला काही प्रमाण नाही. अनेक वर्षे आपल्या माहितीतील ओळखीतील लोकं असतात भेटणं घरी येण जाणं असतं पण औपचारिकता सोडली तर शिष्टाचाराची घडी सैल होत नाही. तेच काही लोकं अल्प भेटीतच मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसतात. स्थळ वेळ काळ आवड निवड या साऱ्या गोष्टी जुळून येतात. वेव्ह लेंथ जुळते ती अशी.. असो.
भरपूर गप्पा मारत आम्ही रिसॉर्ट वर पोहचलो बाकी मंडळी आधीच जमली होती. मला जे हवं होतं तेच झालं जयदिप ला माझ्या सोबत पाहून सारेच अवाक झाले. सातवीच्या वर्गातील सर्व आठवणी ताज्या झाल्या. हाय हॅलो होत काही मिनिटातच सर्व एक झालो. तृप्ती व कल्पना ने आधी म्हणालो तसे काही गेम्स व खेळ सुरू केले.. दंगा मस्ती करत ते एन्जॉय पण केले. जयदिप पण आमच्यात लगेच मिक्स झाला वाटतच नव्हते की आम्ही त्याला इतक्या वर्षांनंतर भेटतोय ते. जेवणानंतर खरी रंगत जमली ती गाण्यामुळेच अर्थातच जयदिप.
*रिमझिम गिरे सावन*
दरवेळेस पाऊस आणि हे राॅमेन्टिक गाणं हे समीकरण आहेच. पंचमची मेलोडीयस धून, योगेशजींचे भिडणारे शब्द, लता आणि किशोरदा चा आवाज व भर पावसातली मुंबईची सैर घडवत रममाण झालेली अमिताभ व मौसमी ची केमिस्ट्री... सारेच लाजवाब.
खरंच बाहेर पाऊस दणक्यात कोसळतो आहे. सारे जण तोच पाऊस अनुभवत जयदिपच्या सुरात न्हाऊन निघताय..
*याड लागलं गं याड लागलं गं*
*रंगलं तुझ्यात याड लागलं गं*
*वास यो ऊसात येई कस्तुरीचा*
*चाखलंया वारं गोड लागल गं*
सैराट सारा मामलाच सैराट अजय अतुल 👌🏼 त्याहून जबरदस्त गायलं ते जयदिप ने..
ओह सजना बरखा बहार आयी
रसकी फुहार लाई, अखियों मे प्यार लाई .... ते शुर आम्ही सरदार पर्यंत अनेक गाणी झाली.. महत्वाच म्हणजे नुसतंच गाणं म्हणणं नसून त्याचा संगीताशी शब्दरचनेशी कसा सुर व ताल जुळतो हे सारं तो उदाहरण देऊन समजून सांगत होता.. आमच्या बाळबोध शंकांचे तो निरसन ही करत होता..
बाहेर पावसाचा माहौल व आत मध्ये सुरांची मैफल ... वाह क्या बात है..
अशाच धुंद वातावरणात सायंकाळचा चहा सोबत भजी.. ते झाल्यावर पुन्हा टिपी.. प्रत्येकात एक लहान मुलं दडलेलं असतं अशा जवळील मित्रांच्या सानिध्यात आल्यावर ते बाहेर पडतं मग चाळीस पन्नास साठ हे वयाचे आकडे काही मायने ठेवत नाहीत... असतो तो एक भेटीचा कल्ला...
निरोपाची वेळ झाली नक्कीच रिकाम्या हाताने व मनाने कुणीच घरी परतलं नाही.. हे चार्ज झालेलं मन पुढिल काही दिवस तरी आठवणींच्या रूपाने तजेला देत राहिल..
बहुत काय लिहणे...
इति लेखनसीमा....
ता.क. बाईपण भारी देवा चा माहौल असल्याने फक्त महिला मंडळाचा फोटो टाकला आहे. 😃
सहभागी भिडू :
तृप्ती
सोनाली
पल्लवी
सुजाता
मनिषा
कल्पना
जयेश
मयुरेश
अमित
अजित
जयदिप
अस्मादिक (योगेश)

No comments:
Post a Comment