Wednesday, 6 September 2017

Met our school teacher

सर भेटतात तेव्हा !


काल आपल्या ग्रुपवर आलेल्या या फोटो बद्दल, आत्ता सायंकाळी फडके हॉस्पिटलमध्ये आपले ‘कार्येकर’ सर भेटले. अर्थातच इतक्या वर्षानंतर पाहिल्यावर त्यांच्यातला बदल बराच जाणवला. ते तर मला ओळखणे शक्य नव्हतेच. मी पण सुरूवातीला शांत बसुन त्यांच्या कुणा ओळखीच्या व्यक्तिसोबतच्या गप्पा ऐकत होतो.  त्यांच्या गप्पांबद्दल तुम्हा मित्रांना फारसे सांगणे न लगे. सर्व काही ठिकठाक आहे. कानाने कमी ऐकू येतं आता,. जास्त उंचावर मी फिरत नाही, फार तर माथेरान - महाबळेश्वर ( मराठी माणुस तसाही या पल्याड जात नाही) स्वप्निल आल्यावर सिंगापुर जायचं ठरतय. १७ नोव्हेंबर ला केरळ जाणार आहोत वगैरे वगैरे गप्पा सुरू होत्या. त्यात असं कुणी पुर्वीचं ओळखीचं दिसलं कि माझी अतिनिरीक्षण करायची घाणरेडी सवय त्यात भर म्हणजे एकटक पहाणे. आता सरांचा चेहरा पडला हसरा सहाजिकच डोळे बारीक करून सोनेरी चष्म्याच्या कड्यातून माझ्याकडे पाहू लागले. मग शेवटी मीच विचारपुस केली. नेहमी प्रमाणे ख्याली खुशाली मग विषयाला हाथ घालत सरांना काल आपल्या ग्रुप वर आलेला फोटो दाखवला, "अरे हा.. आत्ताच दोन चार दिवसांपुर्वी राजा मध्ये भेटलो होतो"                                                                                                                                      मी: “किती सालची ब्याच ?”
सर:  “मेमरी रिकॉल होत नाही. आत्ताच त्यांना २५ वर्षे पुर्ण झाली.”                                           
मी : “२५”
सर: "म्हणजे बघ आता २०१७ त्यातून २५ गेले (एका सेकंदात) १९९२ ची ब्यॉच". मला क्षणभर बीजगणिताचा तास आठवला, गणित अजुन पक्कय मास्तरचं.                                                                                      
सर:  "तुझी दहावी कधीची ?"
मग आपली कारकिर्द उगीचच जास्त लांबवत बसलो नाही. तसेही फारमोठी दैदिप्यमान माईलस्टॉन वगैरे ठरली नसावी आपली ब्यॉच. नंतर शाळेचा विषय आला, आता देवळात गेल्यावर देव तसे मास्तर भेटल्यावर शाळा आठवणारच ना ! 
शाळेबद्दल बोलताना अर्थातच एक प्रकारची वेगळीच खिन्नता जाणवली. काळ बदलला , पुर्वीसारखं नाही आता. त्यावेळी जवळपासची थोडाफार लौकीक पाहून शाळेत घातलं जाई आणि आता शाळेतसुध्दा घालताना एमिनिटीज कडे पहायलं जातयं. काळाचा महिमा मग सरकारी धोरण, शिक्षण पध्दती ते पार शिक्षण सम्राट वगैरे चर्चा झाली. मुख्य म्हणजे भाषेचा मुळ गाभा कुमकुमवत राहून माध्यमाला पर्याय तयार केला गेला तितेच काळाच्या गरजेनुसार इंग्रजीने बाजी मारली. सरांसोबत बोलत असताना मलाही ते पटत होतेच, आज मला नाही वाटतं आपल्यापैकी एकाची ही मुलं मराठी माध्यमात शिकत असावीत ! अर्थात यात आपला काही दोष नाहीच मुळी, भरमसाठ फि देऊन चांगली शाळा निवडायचा प्रत्येकाला अधिकार आहेच की. दुर्दैवाने आज मराठी शाळा पोळी भाजी केंद्राप्रमाणे ज्या कधीही बंद होऊ शकतात तर दुसरीकडे मल्टीक्युसाईन रेस्टॉरंट प्रमाणे इंग्रजी शाळा का? कसे? 
काही न बोलता याच विचारात सरांकडे पहात होतो..
"बाबा डॉक्टर अंटी आल्या " आतून मुलीने आवाज दिला सरांनी कौतुकाने मुलीकडे पाहून हसर्या चेहराने माझा निरोप घेतला.

योगेश चंद्रकांत आहिरे



No comments:

Post a Comment