नाणेघाट व भोरांड्याचे दार.
पावसाची थोडीफार का असेना सुरूवात झाली होती, बरेच दिवसापासून आमच्या जुन्या ग्रुप चा ट्रेक काही ठरत नव्हता. मग तोंड पुस्तकावर सर्व जुन्या भिडूंना आवाहन केले, चांगला प्रतिसाद मिळाला.नेहमीप्रमाणे ७-८ जण तयार झाले व त्यातले काही मोक्याच्या वेळी टांगारू झाले, उरलो आम्ही ४ आणि ट्रेक ठरविला नाणे घाटातून चढाई करून भोरांड्याच्या दारातून खाली उतरायचे.
भोरांड्याचे दार ही वाट करायची हे, खुप दिवसापासून मनात होते पण योग येत नव्हता. या वेळी ते ठरविले, पण या वाटे बद्दल कोणाला काही जास्त माहीती नाही. फारच कमी हौशी ट्रेकर व काही गावकरी इथून ये जा करतात, अन्यथा सर्वच सरळमार्गे नाणेघाटातून येणे पसंद करतात.
ठरल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता मी, निखिल आहिरे, मयुर पुणतांबेकर आणि उत्तम शिंदे कल्याण बस स्थानकात शिरलो. प्रचंड अस्ताव्यस्थता, घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी, साफ सफाईचा पार बोर्या वाजला होता. ते पाहून कल्याण बस स्थानक प्रशासन व एस टी महामंडळबद्ल काय वाटले ते सांगायला नको.
लगेचच माळशेज घाट मार्गे जाणार्या कल्याण - शिवाजीनगर एस टी त बसलो, दोन-अडीच तासात नाणेघाट फाटा उतरलो. वातावरणात बर्यापैकी गारवा होता, आजुबाजूला डोंगरांनी हिरवळ धारण करायला सुरूवात केली होती. हिरवा रंग, समोर असलेला सह्याद्री चा कातळ त्यावर पावसाचे दाटून आलेले काळे ढग. एकंदरीत मस्तच माहौल तयार झाला होता. या आधीही नाणेघाट झाल्यामुळे, काही अडचण न येता, आरामात रमत गमत, जुन्या ट्रेकच्या गप्पा टप्पा करत अडीच - तीन तासात नाणेघाटाच्या गुहेत पोहचलो.
प्राचीन सातवाहन कालीन नाणेघाट हा व्यापारी मार्ग सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी तयार केला असावा. सातवाहन कालीन राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण अऩ कोकणात कल्याण व सोपारा ही जुनी बंदरे जोडण्यासाठी, जुन्नर जवळ डोंगर फोडून हा मार्ग केला गेला दगडी पायवाट, वाटेत असणारी पाण्याचे टाके, विसावा घेण्यासाठी गुहा तसेच व्यापार्यांकडून जकात जमा करण्यासाठी रांजण आज ही हे सर्व इथे पहायला मिळते. ( या बद्दल भरपूर माहिती ट्रेकींगच्या पुस्तकात व आतंरजालावर आहे )
जरा वेळ गुहेत विसावलो, पहातो तर लगेच ढगांची गर्दी जमु लागली आणि रिमझिम पावसाला सुरूवात झाली. गुहेच्या बाहेर आल्यावर डाव्या हाताला पाण्याची टाकी आहेत समोरच आणि वरच्या अंगाला काही लहान गुहा आहेत, थोडी फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न केला.नंतर घरून आणलेला जेवणाचा डब्बा खाऊन बाहेर पडलो.
पावसाची बारीक उघडझाप चालू होती आणि धुक्याचे लोट ये जा करत होते. एकंदरीत वातावरण खुपच छान झाले होते. सरळवर पठारावर दाखल झालो समोरच धुक्यात लपलेला जीवधन दिसला. नानाच्या अंगठ्यावर गेलो इथे पण धुके ये जा करत होते. धुके हटल्यावर खाली दुरवर कोकणात वैशाखरे, टोकावडे ही गावं दिसली. उत्तरेला भैरवगडाचे हलकेसे दर्शन झाले. तर दक्षिणेला धाकोबा, दुर्ग, आहुपे घाटाचा कडा व गोरख मच्छिंद्र अधुन मधुन दिसत होते.
पठारावर बरीच गर्दी जमु लागली होती, तिथेच घाटघर गावातील दोन स्थानिक तरूण भेटले. थोड्या बोली चाली नंतर त्यांना विचारले, "आम्हाला भोरांड्याच्या दाराने खाली उतरायचे आहे वाटेबद्दल सध्याची स्थिती कशी आहे ?" कारण पावसाचे सुरूवातीचे दिवस वाटेबद्दल खात्री करून घेतलेली बरी. नाणेघाटाच्या उजव्या बाजूला एका टेपाडच्या बाजूने एक सरळ वाट खाली उतरते तिलाच भोरांड्याचे दार म्हणतात. खाली उतरून भोंराड्यात अथवा मोरोशीत जाता येते. पाऊस एव्हाना चांगलाच बरसु लागला होता त्यात धुकेही वाढत होते. शेवटी त्यांच्यापैकी एकाला आम्ही विचारले, " तूच चल आम्हाला घाटाच्या तोंडापर्यंत / दारापर्यंत वाट दाखवायला." कारण आम्ही चौघेही पहिल्यांदाच तिथून जाणारे, दुपार झालेली पाऊस आणि त्यात धुके. या वातावरणात पठारावर आम्ही जर वेळ घालविला असता तर पुढचे गणित अवघड झाले असते.
थोड्या वाटाघाटी नंतर एक जण तयार झाला, नाव - गणेश लोखंडे. वाटेतल्या एका झापातून छत्री घेऊन आमच्यापुढे चालू लागला. आपल्या मोबाईलवर लाऊड स्पीकर ने ९० च्या दशकातील कुमार शानु, नदिम श्रवण ची गाणी ऐकत ऐटीत चालला होता. यामुळे आमचे आणि त्याचे बोलणे यात गोंधळ उडत होता. एक गोष्ट चार वेळा विचारल्यावर त्याला ते समजायचे पण गाणी महत्वाची असो तर...
पठारावरील करवंदे खात खात असंख्य खेकड्यांची बिळे चुकवत अर्धा तासाच्या चालीनंतर भोरांड्याच्या दारापाशी आलो.
ती उतरती नाळ बघून मला तर त्रिगुणधारा- डोणीदार घाटाची आठवण आली.
परत धुके जमायला सुरूवात झाली, खाली दरीत काहीच स्पष्ट दिसत नव्हते. बर्यापैकी खडी उतरण नाळेतले मोठ मोठाले धोंडे आणि दगडी. साधारण पणे उतरताना हा ओढा उजव्या हाताला असावा, ही थोडी माहिती होती. वाट थोडी डावीकडून पुढे सरळ खाली उतरून, ओढ्याच्या साथीने एका पुलाजवळ मुख्य मुरबाड माळशेज रस्ता आहे तिथे निघते. तिथेच 'भोरांडा द्वार वॉटर फॉल' हा बोर्ड लावला आहे.
सरळ दिशेला न चुकता गेलात तर एका तासात उतरून जाल. असे तो गणेश म्हणाला. मी आणि निखिल ऐकेमेंकाकडे पाहत राहिलो. त्याचे आभार मानून आम्ही हळुहळु वाट उतरायला लागलो, नाळेत पाऊल टाकताच टपाटप पावसाला सुरूवात झाली.काही मिनिटातच पाऊस धो धो कोसळु लागला व धुके दाट होऊ लागले. नाळ बर्यापैकी तीव्र उताराची होती, खाली मोठाले दगड त्यात खेकड्यांची जत्रा. अरूंद अशा वाटेच्या कातळभिंती वरून पाण्याचे लोट वाहू लागले, बराच अंधार दाटून वातावरण एकदम पालटले.
आम्ही पूर्ण शांत चित्ताने, अत्यंत सावधगिरीने उतरत होतो. पहिल्या दहा ते पंधरा मिनिटातच थोडे खाली आल्यावर डावीकडे कड्याला चिकटून जाणारी वाट दिसली, ओढ्यातून बाहेर त्या वाटेवर सरकलो, वाट हळुहळु उतरू लागली. भर पावसामुळे आणि वार्यामुळे ठिक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तरी सुध्दा या भागातली ऊंच ऊंच व दाट झाडी पाहून बरे वाटले, या वाटेचा वापर कमी असल्यामुळे म्हणा अथवा फारशी ये-जा नसल्यामुळे मानवनिर्मित खाणा खुणा किंवा कचरा वगैरे असे काही नव्हते ही पण एक चांगली बाब म्हणा. पाऊण तासात एका ओढ्यापाशी आलो, नाळेतल्या मुख्य ओढ्याचे बहुतेक दोन भाग झाले होते. मुख्य पुढची वाट दिसेनाशी झाली होती. खाली तीव्र उतरण आणि प्रचंड प्रमाणात झाडा पाचोळा, पावसाने पण चांगलेच झोडपले होते. रेन कोट, ज्याकेट वगैरे पार ओलेचिंब आणि साथीला गार वारा व धुके.
थोडे पुढे उजवीकडे सरकल्यावर, तिकडच्या ओढ्या पलीकडे एक वाट सरळ उजवीकडून वळसा मारत पुढे जात होती, वाट अत्यंत ठळक होती. पण दिशेनुसार मनात शंका आली, कारण आम्हाला तर सरळ खाली उतरायचे होते. मग मी आणि निखिल आम्ही त्या वाटेवर पुढे जाऊन पहायचे ठरविले, त्या जागेवर उत्तम व मयुर यांना थांबायला सांगून, आम्ही दहा ते पंधरा मिनिटे त्या वाटेवर चालत होतो. मग ध्यानात आले ही वाट जरी ठळक असली तरी ती ओढ्याला धरून खाली उतरत नाहीये. ही कदाचित लाकुडतोडे किंवा गुराख्याची वाट असेल ? किंवा पदरातून सरळ आडवी मोरोशी किंवा भैरवगडाच्या दिशेला तर जात नसेल? मनात बर्याच शंका कुशंका निर्माण झाल्या. ( जर कोणा जाणकाराला या वाटेबद्दल माहीत असेल तर मला जरूर कळवा. ) पुन्हा माघारी आलो, वेळ आजिबात वाया घालवून चालणार नव्हते. डावीकडे पाहिले तर तिकडच्या ओढ्यातून पण मार्ग दिसत नव्हता.
जरा वेळ शांतपणे विचार केला. सरळ दिशा धरून समोरच्या सटकणार्या कातळावरून सावकाश उतरून पुढे गेल्यावर झाडीत एक वाट अस्पष्टशी दिसली. पुढे जात वाटेतल्या फांद्या काडक्या बाजूला सारत हळुहळु खाली उतरू लागली. मध्येच वाट नाहीशी होत मग पुन्हा उजव्या डाव्या बाजूने अंदाज घेत मुळ वाटेला लागत होतो.नाणे घाटाच्या तुलनेत ही वाट कमी वापरातली असल्यामुळे जरा अवघड जात होते, पण तरीही हा एक वेगळाच अनुभव होता. नेटाने पुढे पुढे जात होतो. एव्हाना पाऊस कमी झाला होता व धुकेही गायब झाले होते. आम्ही बरेच अंतर खाली उतरलो होतो. मागे वळून सरळ पाहिले तर भोरांड्याच्या दारावर धुके ये जा करत होते. म्हणजेच आम्ही दिशेप्रमाणे योग्य वाटेला होतो. काही मिनिटातच उतरण कमी झाल्यावर नाळेतला मोठा ओढा उजव्या हाथाला लागला. तसेच थोडे पुढे गेल्यावर काही ठिकाणी सिमेंट बंधार्याचे काम केलेले दिसले. जरा पुढे आल्यावर लगेच सिमेंट कॉंक्रीटची पायवाट आणि मुरबाड माळशेज मार्गावरचा पुल दिसला.
बाजुच्या ओढ्यात तोंड हातपाय धुवून निवांत झालो. परतीच्या वाटेवर कल्याण कडे जाणार्या गाडीची वाट पाहू लागलो. एक ही एस टी थांबली नाही शेवटी एका टेम्पो वाल्याने टोकावडे पर्यंत सोडले, मग तिथून खचाखच गर्दीने भरलेल्या एस टी ने कल्याण ला परत आलो. एका दिवसात दोन सुंदर घाटवाटांची यात्रा घडली होती.प्राचीन असा नाणेघाट व त्याचा शेजारी भोरांड्याचे दार.
योगेश चंद्रकांत आहिरे.

सुंदर लिहिला आहे लेख तुम्ही.
ReplyDeleteआणि तोंड पुस्तक नाही, थोबाड पुस्तक हो
saahi
ReplyDeleteThank you Ajit
ReplyDeleteभोंराडे दाराच्या सुरूवातीला पठारावर पाण्याची तीन टाकी आहेत.आम्हाला ती सापडली नाहीत.तसेच भोंराडे घाटात उतरताना ओढयाच्या उजव्या हाताला आंब्याच्या झाडासमोर वरच्या बाजुला उंचावर कातळात खोदलेल पाण्याचं जोडटाक आहे.ते लवकर दिसत नाही.(मला हि माहिती साईप्रकाश बेलसरे यांच्या लेखावरून मिळाली तेव्हा ते टाक समजलं).ही प्राचीन वाट असावी.नंतर बरीच खाली आली की उजवीकडे ओढा पार करून थोडी खाली उतरून टावरजवळुन आम्ही मुख्यतः हायवेला उतरलो होतो.एसटी मध्येच उभी राहत नाही.त्यामुळे ५००मि अंतरावर पुढे असलेल्या भोंराडे फाटयावर जाऊन बस पकडली होती.नाणेघाट भोंराडे घाट दोन्ही एका दिवसात सहजपणे होतात व शांत व सुंदर घाटवाटा आहेत.
ReplyDeleteThank you. Actually we were also missed during this trek. So for particularly water tank i had visit again.
Delete