किल्ले कण्हेरगड
हल्ली मी जेव्हा कधी नाशिकला जातो, तेव्हा त्या भागातला एखादा तरी किल्ला पाहण्याचे पुण्य पदरात पाडून घेतोच. या वेळी सुध्दा मनसुबा तसाच होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामानिमित्त नाशिकला जाणे झाले.
नाशिक म्हणजे कोणत्याही अट्टल दुर्गप्रेमींचा विक पॉईंट असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सातमाळा सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक - ईगतपूरी इ.अशा रांगेत अनेक मातब्बर किल्ले वसलेले आहेत.
सुदैवाने वेळ मिळाला आणि साथीला संदिप आणि धनंजय (दोघे ही नाशिकस्थित माझे मामे भाऊ). माझ्या सोबत येण्यास तयार झाले. त्यात संदिप आणि मी नाशिक भागातले बरेच ट्रेक एकत्र केले आहेत. धनंजय मात्र ट्रेकची सुरूवात होती.मग काय लागलीच दोन पर्याय तयार
१) पेठ सुरगाणा बाजूचे सोनगिरी, खैराईगड आणि वाघेरा.
२) कण्हेरगड
वातावरण , प्रवासमार्ग, प्रत्यक्षात किल्ले चढाईला लागणारा वेळ या सर्व शक्यता लक्षात घेता , पर्याय दोन निवडला.
इतिहासाचा साक्षीदार, सातमाळ्यातील दुर्लक्षित रत्न कण्हेरगड. सकाळी सकाळी दोन बाईक, नाशिकच्या गुलाबी थंडीत दिंडोरी - कळवण मार्गावर दौडू लागल्या.
डावीकडे रामशेज किल्ला कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला होता. गेल्या २०१५ ची सुरूवात याच रामशेज ने केली होती, आणि योगायोग म्हणजे २०१६ ची सुरूवात पण कण्हेरगड. पुन्हा नाशिक परगणा, क्या बात है !

सादडविहिर हे कण्हेरगडाच्या
पायथ्याजवळचे गाव. (डावीकडे विशिष्ट खाच
असलेला कण्हेरगड )
गावात मोतीराम पवार
यांच्या अंगणात बाईक ठेवून
कण्हेरगडाच्या दिशेने चालायला सुरूवात
केली. त्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला हा कण्हेरगड.

मळलेल्या पण भुसभुशीत मातीच्या पाऊल वाटेने अर्ध्या तासात खिंडीत पोहचलो. वाटेत गावातली शाळेतली चार मुलं भेटली. 'कुठून आलात, किल्ल्यावर जाताय चला आम्ही पण येतो'. खिंडीत जरा विसावा घेतला.
खिंडीपलीकडून कण्हेरवाडी गावात जाता येते. कण्हेरवाडी आणि सादडविहीर या दोन्ही गावातून येणार्या वाटा याच खिंडीत येऊन मिळतात. इथून पुढे गडाच्या सोडेंवरच्या उभ्या चढाईला सुरूवात झाली.
सुरूवातीला बघून फुटकळ वाटणार्या या वाटेने चांगलाच दम काढला. नवख्या धनंजय ला तर चांगलीच धाप लागून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचा सोबत हळूहळू ती मुरमाड घसरडी वाट पार करून पडक्या बुरूजापाशी आलो.

तासाभराच्या विश्रांतीनंतर गडमाथ्याकडे निघालो. कातळकड्याला चिकटून डावीकडून पायर्यांच्या मार्गाने माथ्यावर दाखल झालो. समोरच हे खांब ? नजरेत भरले पण प्रयोजन काय ते कळले नाही. दरवाजा असू शकेल पण तसेही वाटत नाही अर्थात तिथून चढता उतरता येते पण मुख्य वाट त्याचा बाजूने वर चढते. गडाला बर्यापैकी सपाट माथा लाभला आहे. गडाच्या गवताळ माथ्यावरून सातामाळा रांगेतले बहुतेक किल्ल्यांचे तसेच चौलेर दूरवरचा साल्हेर सालोट आणि जवळच असलेला प्रेमगिरी सहज ओळखता आले. पण सावलीसाठी मोठ्या झाडांची वाणवाच. थोडाफार असलेला वारा हिच काय ती जमेची बाजू. सहा सात पाण्याची टाकं,

गडाच्या पश्चिम टोकाला धोडप आणि पिसोळ किल्ल्यावर आहे तशीच खाच नजरेस पडते. समोरच्या पठारापलीकडे मार्कंड्या आणि सप्तश्रुंगी लगेच ओळखता आले.
सोबत आलेली हि चौकडी डावीकडून निलेश, दुर्गेश, राहुल सुनिल
मग आमचाही एक फोटो, डावीकडून संदिप, अस्मादिक आणि धनंजय.

या टाक्यापलीकडे रावळ्या जावळ्या.
माथ्यावर फेरी मारून थोडे खाली उतरून गडाच्या गुहेत आलो. गुहा भूमिगत प्रकाराची वाटली.
गुहेसमोरच सातमाळ्यातील मुकुटमणी किल्ले धोडप. त्याच्या पलीकडे ईखारा, कांचना, आणि डोळे बारिक करून ईंद्राई, चांदवड यांचे दर्शन झाले. गुहेतून खाली कण्हेरवाडी, नरूळ ही गाव दिसतात. पुन्हा माथ्यावर आलो. आल्या मार्गाने उतरायला सुरूवात केली.

त्या घसरड्या वाटेने सावकाश उतरत सायंकाळी पाच वाजता गावात परतलो. वाटेत रस्त्याच्या कडेला माझी बाईक उभी करून कण्हेरगडाचा एक फोटो घेतला.
पुन्हा एक दमदार दुर्ग दर्शन करून प्रसन्न आणि रोमांचित होऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
योगेश चंद्रकांत आहिरे

मस्त रे याेगेश भाऊ..कण्हेरच्या चरणी ४ वेळा लीन झालाेय..फक्त धुरंधर रामजी साठी ..
ReplyDeleteThank you Sir !
Deleteयोगेश भाऊ, मस्त सुरुवात!
ReplyDeleteअभिनंदन, ब्लॉग प्रकरण मनावर घेतल्याबद्दल!
एकदा efforts टाकून जुने सगळे ब्लॉग्ज इथे आणलेत, तर एक चांगला reference तयार होईल.
ता.क. ब्लॉग खूप लोकांना कळायच्या आत, custom domain registrationचा विचार करता येईल.
धन्यवाद ! साईदा, सुरूवात तर केली आहे.
ReplyDeleteमस्त रे योगेश! अभिनंदन ब्लॉगर झाल्याबद्दल.. साईशी पूर्ण सहमत. ब्लॉगही छान आहे. नासिक भागापासून सुरुवात केलीस. येथील दुर्ग तुझ्यावर कृपा ठेवून असतील.
ReplyDeleteहेम साहेब प्रचंड धन्यवाद !
ReplyDeleteनक्कीच प्रयत्न करणार I
ब्लाॅग छान झालाय 👌🏾
ReplyDeleteसगळी सातमाळा भटकुन झाली...कण्हेरगड आमच्या वाटेला काही येईना...यांच्या पायथ्याशी जवळून किती वेळा जाणे झाले असेल याची मोजदाद नाही 😣
धन्यवाद प्रशांत साहेब..
Delete