बदलते
ट्रेकींग..... ज्याला अंत नाही असा विषय
१७-१८ वर्षांपुर्वी जेव्हा सह्याद्री थोडाफार भौगोलिकदृष्ट्या कळू लागला, तेव्हापासून खर्या अर्थाने भटकंतीला सुरूवात झाली. मग कर्मधर्म संयोगाने अथवा योग्यवेळी योग्य माणसांच्या सानिध्यात आल्यामुळे असेल कदाचित पण एक दिशा मिळाली. आज सोशल मिडीयावर जे काही दिसतंय त्यावेळी इतपत नव्हते थोडक्यात हागणदारीच्या दुकानदारीचा सह्याद्रीत प्रादुर्भाव नव्हता, आता हे सर्व आवाक्याबाहेर गेलं आहे हे माझं मत मी गेल्या लेखात मांडले होतेच. https://ahireyogesh.blogspot.com/2016/08/can-we-stop-this.html

आज ट्रेकींग
हे खुपच सोपे झाले आहे, एका क्लिकवर माहिती आणि अगदी दुर्गम गावातला संपर्क मिळतो
आणि इथेच खऱी मेख आहे. असे संपर्क आपातकालीन समयी उपयोगी पडतात हि एक चांगली जमेची
बाजू. पण नेमका याच गोष्टीचा अतिफायदा काही क्षुल्लक बाबींसाठी घेतला जातो
जसे की गावात जेवण आणि वाटाड्या. हागणदारीचे दुकानदार जे ३५-४० च्या संख्येने
बाहेर पडतात सहाजिकच ते पहिले या सेवेचे लाभकरी. जास्त वाद घातला कि म्हणे अशामुळे
गाववाल्यांना रोजगार मिळतो, लक्षात घ्या तुमच्या सीजनल ट्रेक किंवा महिन्यातल्या
दोन चार ट्रेक ने त्यांच्या उत्पन्नांत काही फरक पडत नाही, अपवाद साम्रद, पाचनाई,
लोणावळा जवळचा काही भाग यात दोष गावकरींचा मुळीच नाही. दुकानदारीची (३५-४० ) ती
गरज मग सहाजिकच मागणी तसा पुरवठा हे सूत्र लागू पडले.
मुळातच पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा सह्याद्रीत ३५-४० माणसं एकावेळी गेल्याने काय होतं असेल हा तर भला किचकट विषय त्याबद्दल पुन्हा कधी तरी.
आता दुसरा वाटाड्या विषयी वादात्मक मुद्दा, या बद्दल माझे तरी स्पष्ट मत आहे. स्थळ, वेळ- काळ, परिस्थिती, नवखा प्रदेश, सुरक्षितता, तुमचा अभ्यास आणि अनुभवाअंती ठरवावे. यात प्रत्येकाची मतं वेगळी आहेत पण मी तरी वर सांगितल्याप्रमाणे मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घेतो.
थोडे खोलात जाऊन सांगतो, पुण्यामुंबईकडील जवळपासचे ट्रेक किंवा आपण वन डे हाईक म्हणतो. असले वहिवाटेतले किल्ले अथवा घाटवाटा विनावाटाड्या अभ्यास आणि अनुभवाअंती सहज शक्य आहेत. थोडेफार भौगोलिक, पर्यावरण, हवामान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरीक्षणशक्ती, दिशेचे भान व नकाशावाचन या जोरावर सहज जमते. हल्ली तर गुगल आणि विकीमापियामुळे अधिकच सुकर झाले आहे. आपणहुन वाटा शोधणे, वेळेचे नियोजन करणे, क्वचित प्रसंगी वाट चुकून येणारे वेगळेच दडपण मग मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याची धडपड. यामुळे कधी काळी अचानक निराशेचे मळभ दाटून येणे पण मग योग्य वाट मिळाल्यावर होणारा आनंद, एक वेगळाच उत्साह संचारून दुप्पट वेगाने केलेली चाल. हा एक वेगळाच भाग, जो वाटाड्या घेतल्यामुळे येत नाही. सहाजिकच स्वबळावर वाटा शोधत फिरण्याची खुमखुमी तिथेच मृतवत होते मग एखाद्याने वाटेबद्दल काही विचारले तर मग हे निरूत्तर, अर्थात एखादा असेलही अभ्यासु. यात आणखी एक मुद्दा वाटाड्यामुळे अवशेष कळतात, गावातले संबध जोडले जातात. यामध्ये पुन्हा तेच सांगतो, वहिवाटेतल्या राबता असलेल्या वाटेवर किंवा किल्ल्यांवर काही फारसा फरक पडत नाही. तुमचे वाचन आणि अभ्यास असल्यामुळे शोधायला फारसे अवघड मुळीच नाही. समजा जर काही कारणास्तव नाही मिळाले मग गावात चर्चा करून समजवून घेऊन पुन्हा तोच ट्रेक करू शकतो, असं थोडीच आहे की एकदा गेलेल्या ठिकाणी पुन्हा जाऊ नये उलट मी म्हणेल, काही वेळा पुन्हा त्याच ठिकाणी काही गोष्टी नव्याने माहित होतात. राहिला प्रश्न गावात संबध जोडण्याबद्दल, ते तर आपण गावातून सुरूवात करताना वाटेविषयी व किल्ल्यावर सध्याची स्थिती काय आहे, जसे रहाण्याची जागा, चढाईचा वेळ, वाटेची स्थिती, पिण्याचे पाणी, माश्या माकडांचा त्रास वगैरे यातही काही वावगे आढळले तर गावकरींची मदत किंवा वाटाड्या घेऊन वाटचाल़ करू शकतोच ना ! तसेच काही अवांतर गप्पा होतातच जसे पिकपाणी, हवामान, वाहतुकीची सोय, दवाखाना, शाळा ते पार राजकारण वगैरे मग यातून सलोखा वाढून संबध निर्माण होतातच. त्यासाठी वाटाड्या हवाचं असे नाही.
आता गावात जेवणाचा विषय. याबद्दलही आधी म्हणालो तसा वाद आहेच, पुन्हा सांगतो याचा रोजगाराशी काही संबध नाही. मावळभागातले व काही ठराविक कोकण पट्ट्यातले काही गावकरी शहरी लोकांपेक्षा कैक पटींनी सदन आहेत ते आपल्याला खिशात घेऊन फिरू शकतात. त्यामुळे ब्राण्डेड पोकळ श्रींमतीचा आव त्यांच्यासमोर कदापि आणू नये. वागण्यात आचरणात नम्रता कायम असावी. वाट्टेल ते पैसे मोजू पण आम्हाला घेऊनच चला हा अट्टाहास मुळीच नको. हे सर्व सांगणे यासाठी की जेवणाचा आणि वाटाड्याच्या गावकरींच्या रोजगारीशी काडीमात्र संबध नाही, दुकानदारीची ठिकाणं वर अपवादात्मक देऊन ठेवली आहेत. उलटपक्षी किमान एकदिवशीय ट्रेक साठी घरातून जेवण नेण्याची सवय लावून घ्यावी. शाळा कॉलेजात किंवा कामावर जर चांगली सोय नसेल तर आपण घरातूनच नेतो ना. अगदीच काही वैयक्तिक कारणास्तव शक्य नसेल तर सुका खाऊ तसेच खजुर, अंडी, फळे यावर एक दिवस सहज निघू शकतो. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पैसा आणि वेळ वाचतो. आपल्याला हवे तिथे हवे तितकावेळ जेवणासाठी देता येतो, कुण्या गावात किंवा हाटेलवजा घरात अडकून विनाकारण वेळ वाचतो. मी तरी या गोष्टी कटाक्षाने पाळतोच़ आणि सोबत नवीन सहकारी असतील तर त्यांना ही हेच सांगतो. अगदी वेळेप्रसंगी नाईलाज असेल किंवा मोठ्या ट्रेकचा नियोजनाचा भाग असेल तर कधीकाळी हरकत नाही पण याची सवय होता कामा नये. मी तर बहुतांश मोठ्या जंबो ट्रेक मध्ये सुध्दा स्वत: शिधा घरातून पाठीवर नेऊन जेवण शिजवून घेतले आहे, रात्री वस्तीवर एखाद्या गुहेत, मंदिरात, शाळेच्या आवारात सहज शक्य होते. कांदा बटाटा ते अगदी चहा पावडर- दुध पावडर ते स्टॉव्ह मग रॉकेल अथवा उन्हाळ्यात चुल पेटवायला काडक्या छोटा लाकुडफाटा जमा करणे हा सर्व उपदव्याप केला आहे. न सांगता प्रत्येक जण आपआपसात जबाबदारी वाटून घेत, जसे पाणी आणणे, स्वयंपाकाची तयारी, चुल पेटवणे ते अगदी रात्रीची भांडी घासण्यापर्यंत आपसुकच स्वावलंबन वाढीस लागून वेळ आणि पैशाची बचत.
कुठंतरी बहुतेक 'सांगाती सह्याद्रीचा' मध्ये सुरूवातीलाच सुंदर परिच्छेद वाचलेला थोडेसे आठवतंय. "गिरीभ्रमण हा एक सर्वांग सुंदर छंद आहे. साहस याचा पाया आहे. एकेमेकांस मदत, स्वावलंबन, शारीरिक मेहनत याचे मुलभूत पैलू आहेत." अर्थात सध्या जेवढे आठवले तितकेच मांडले पुढे बरेच काही आहे.
पण..... पुन्हा पण, हल्लीची चमकोगिरी आणि फेसबुकवर हागणं मुतनं सांगून स्वत:चा पार्श्वभाग लाल करून घेणारे दिसले की डोक्यात वेगळीच सरसरी येते. लक्षात घ्या मला कुणाबद्दल सांगायचे आहे, माझ्यासारखे किंबहुना त्यापेक्षाही चांगल्या पध्दतीने दर्जेदार ट्रेक करणारे आहेतच. पण या चमकोंना खऱ काय ते समजलेच नाही. साहस, स्वावलंबन, शारिरीक मेहनत (नुसते छटाक पिट्टू घेऊन चालणे नव्हे, तर तुमचा camp site वरचा activeness कुठल्याही कामासाठी फार महत्वाचा) या गोष्टी फारश्या रूजतच नाही.
मग काय याच लोकांनी गावात आगाऊ जेवण आणि वाटाड्या सांगून चुकीच्या पध्दतीचा पायंडा पाडला. सहाजिकच पैसे मोजून सर्व काही सहज शक्य आहे हेच सुरू . ‘पैसा फेको तमाशा देखो’ हि वृत्ती त्यातूनच निर्माण झाली. अरे ट्रेक काय ? गावात चांगली सोय होते कुणीतरी सोबत घ्यायचं आणि निघायचं. मग काय दिवसेदिवस यामुळेच सह्याद्रीत नवीन भटक्यांची ? संख्या वाढत आहे. कारण एकच सगळी सोय होते..... अर्थात सह्याद्रीत भटकणे ही कुणा एकाची मिरासदारी मुळीच नाही, निसर्ग सर्वांसाठी समान त्याचा आनंद कुणीही घेऊ शकतो. पण कुठेतरी काही तरी ठराविक पध्दत अथवा रीत असावी. नाहीतर दुकानदारांनी जत्रा वाढवली आहेच मग त्यांचे प्रबोधन करा, त्यांना समजेल असे संदेश द्या किंवा पाट्या लावा कशाला हवे हे ? त्यापेक्षा नवीन लोकांना आयतं खाऊ न घालून ट्रेकच्या मुलभूत नियमांनीच त्यांना तयार करायला हवे, ज्याला शिस्त झेपेल तो करेल.
सेफ्टीचा अतिरेक म्हणा किंवा भयंकर कम्फर्ट झोन वाढवून ट्रेकींगला एवढेपण सोपं नका करू हि कळकळीची विनंती.

तळटिप : या लेखात मी माझे स्पष्ट मत मांडले आहे. बहुतेक ठिकाणी 'मी' पणा आला आहे पण त्याला नाईलाज आहे. कुणाला काही वाटो जशी माझी ट्रेकींगची जडण घडण झाली, त्याचा हा परिणाम. सरतेशेवटी एकच सांगतो चांगले करता येत नसेल तर निदान बिघडवु तरी नका.
योगेशभाऊ,
ReplyDeleteमुद्देसूद, योग्य मत...सहमत आहे.
धन्यवाद !
Delete👍👍
ReplyDeleteमनातलं
ReplyDeleteजबरी...योगेशा,लोकांनी खुपच सोपं करून ठेवलंय,खुप मोठी खंत!!!
ReplyDeleteधन्यवाद संदिप.
ReplyDeleteआपलं म्हणून शंभर टक्के खरं आहे.ट्रेकिंगमुळे गावकरयांमध्ये जेवणाची खाणावळ खोलवर यासारखी रीघ लागते.व गाईड हि नवीन पत्रकार उदयास आला आहे.यामुळे काही पर्माणात गावकऱ्यांना आर्थिक प्रमाणात हातभार लागतो पण रोजगाराची समस्या सुटत नाही.त्यखसाठी दुसरे मार्ग आहेत.याउलट काहीजण शेती व काम करायचं सोडुन गाईड बनले आहेत व हांटेल टाकुन बसेल आहेत.यामुळे शहरीकरणाचे दुष्परीणाम ग्रामीण राहणीमान व संस्कयीवरही होत आहेत.बेजबाबदार
ReplyDeleteपर्यटकांना रोखणार कुणीही नाही.हुल्डलबाजी,गोंधळ,धिंगाणा घालते हा प्रकार वाढला आहे.भटकंतीचा मुळ गाभा नष्ट होत आहेत.ट्रेकिंगच्या हौशेमुळे पर्यावरणाचं भान व शिस्त न राखल्याने प्लास्टिक व इतर कचरा गड,किल्ले,लेण्या,पाऊलवाटांवर वाढला आहे.पाणवठे,ओढे कचरयामुळे असंवच्छ होत आहेत.गडकिल्पले अपघात वाढत आहेत.दारू,नशापाण्यासाठी निवांत जागा म्हणुनही सह्याद्रीचा गैरवापर वाढत आहेत.फारृमहाऊस,नाईट ट्रेक हे अनैतिकति व रासलीलाचेअड्बडेनले आहेत.हया सर्वांचा सह्याद्री परिसरावर विपरीत परिणाम होत आहे व हे वेळीच थांबायला हवं.
धन्यवाद
Deleteअगदी मनातले विचार मांडलेत.
ReplyDeleteधन्यवाद !
Delete